Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण
कसबापेठ, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा!

चिंचवडमधून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला भाजपकडून संधी
पुणे : पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नधनानंतर रिक्त झालेल्या पदासांठी पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूकी साठी भाजप आणि महाविसाक आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
भाजपने चिंचवड येथील पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्य पत्नी आश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तर कसबा पेठ येथील पोटनिवडणुकीसाठी पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
महाविकास आघाडीने चिंचवड येथील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे राहुल कलाटे यांना उमेदवारी दिली आहे. तर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या रविद्र धंगेकर उमेदवारी जाहीर केली असल्याची माहिती मिळत आहे.





