२१ वर्ष कट्टर शिवसैनिक असलेला आयटी सेलप्रमुखच भाजपने फोडला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/Ramesh-Solanki.jpg)
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
रमेश सोळंकी हे २१ वर्षांपासून शिवसेना आयटी सेलचे प्रमुख आणि गुजरात राज्याचे संपर्क प्रमुख म्हणून काम करत आहेत. शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते राहिले आहेत. मुंबईत १५ हजार कार्यकर्त्यांसोबत त्यांनी काम केले आहे. त्यांचे दांडगा संपर्क आहे. भाजपात त्यांनी आज पक्ष प्रवेश केला आहे. ते पक्ष वाढीसाठी अहोरात्र मेहनत घेतील अशी अपेक्षा चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला लागलेली गळती अजून सुरुच आहे. २१ वर्षांपासून शिवसेना आयटी सेलचे प्रमुख आणि गुजरात राज्याचे संपर्क प्रमुख म्हणून काम पाहिलेल्या रमेश सोळंकी (Ramesh Solanki) यांनी भाजपचा झेंडा हाती धरला. खरं तर शिवसेनेने काँग्रेससोबत हातमिळवणी करत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले, तेव्हाच सोळंकीनी युवासेना-शिवसेनेच्या पदावरुन राजीनामा दिला होता. मात्र आता त्यांनी अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत सोळंकींचा पक्षप्रवेश झाला.
रमेश सोळंकी हे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आहेत. २१ वर्षांपासून शिवसेना आयटी सेलचे प्रमुख व गुजरात राज्याचे संपर्क प्रमुख म्हणून ते काम करत आहेत. मुंबईत १५ हजार कार्यकर्त्यांसोबत त्यांनी काम केले आहे. त्यांचे मोठे प्रभावक्षेत्र राहिले आहे. भाजपात त्यांनी आज पक्ष प्रवेश केला आहे. पक्ष वाढीस ते अहोरात्र मेहनत घेतील अशी अपेक्षा आहे. भाजपा त्यांना सन्मानाने चांगले काम देईल असे मी आश्वस्त करतो, असं चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले.