Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

घाटकोपरमध्ये विहिरीत बुडालेली कार अखेर 12 तासांनी बाहेर काढली

मुंबई – घाटकोपर परिसरात पार्क केलेली कार नेमकी कशामुळे बुडाली याबाबत अनेक तर्क लावले जात होते. मात्र आता त्यामागचे नेमके कारण समोर आले आहे. रविवारी सकाळी याठिकाणी एका खासगी इमारतीच्या परिसरातील विहिरीत बुडालेली कार अखेर 12 तासांनी बाहेर काढण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीच्या परिसरात एक विहीर होती. मात्र सोसायटीने ती विहीर बुजवून त्यावर आरसीसी बांधकाम केले होते. त्यानंतर विहीरीचा भाग गाड्यांच्या पार्किंगसाठी वापरला जात होता. मात्र गेल्या चार दिवसांपासून मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जमीन भुसभुशीत झाली होती. अखेर रविवारी सकाळी याठिकाणी खड्डा पडून कार अवघ्या काही मिनिटांत विहिरीत बुडाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर ही कार विहिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. पंपाच्या साहाय्याने विहिरीतील पाण्याचा उपसा करून क्रेनच्या साहाय्याने ही कार बाहेर काढण्यात आली.

दरम्यान, मुंबईच्या घाटकोपर परिसरात विहिरीवर एक स्लॅब टाकला होता. अर्धी विहीर झाकून स्लॅबच्या माध्यमातून त्यावर पार्किंगसाठी जागा करण्यात आली होती. हा स्लॅब पूर्णपणे जीर्ण झाला होता. या स्लॅबवर घाटकोपरच्या कामा लेनवरील रामनिवास या इमारतीत राहणारे डॉ. दोशी यांनी गाडी पार्क केली होती. यावेळी त्यांनी गाडी पार्क केल्यानंतर विहिरीवरील स्लॅब कोसळला. परिणामी कार थेट पाण्यात बुडाली.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button