‘शिवसेनेला मुकेश अंबानींकडून पैसे काढायचे होते’, निलेश राणेंची राष्ट्रपती राजवटीची मागणी
मुंबई |
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेली स्फोटकांची गाडी व त्यानंतर या गाडीचा मालक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एनआयएने अखेर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे. मात्र वाझेंच्या अटकेमुळे मात्र भाजपने आक्रमक भूमिका घेत शिवसेनेवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी ‘मीडिया रिपोर्टनुसार सचिन वाझे यांनी शिवसेनेला मुकेश अंबानींकडून पैसे काढायचे होते असे स्पष्ट केलं, असा गंभीर आरोप केला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार सचिन वाजे यांनी शिवसेनेला मुकेश अंबानी कढून पैसे काढायचे होते असे स्पष्ट केलं. याचा अर्थ कि शिवसेना ह्या क्राईम मध्ये एक पार्टी आहे. राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे तिथे सर्व सत्य बाहेर पडणार नाही म्हणून ताबडतोब राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रामध्ये लागू करावी.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 14, 2021
निलेश राणे म्हणाले की, मीडिया रिपोर्टनुसार सचिन वाझे यांनी शिवसेनेला मुकेश अंबानीकडून पैसे काढायचे होते असे स्पष्ट केलं. याचा अर्थ की शिवसेना ह्या क्राईममध्ये एक पार्टी आहे. राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. तिथे सर्व सत्य बाहेर पडणार नाही, म्हणून ताबडतोब राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रामध्ये लागू करावी, अशी मागणी निलेश राणेंनी केली आहे. दरम्यान, भाजप खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून महाराष्ट्रात त्वरित राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था संपूर्णपणे ढासळली आहे. राज्यात जनता सुरक्षित नाही. महाराष्ट्र सरकार राज्य सांभाळण्यास सक्षम नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी अमित शहा यांच्याकडे त्यांनी केली आहे.
वाचा- शरद पवारांच्या ‘त्या’ भाकितावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…





