सचिन वाझे यांची तब्येत पुन्हा ढासळली, जे जे रुग्णालयात दाखल
![Sachin Waze's health deteriorated again and he was admitted to the hospital](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/Sachin-Vaze-1.jpg)
मुंबई – राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोठडीत असलेले यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. त्यांना आता उपचारासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले आहे. काल रात्रीही सचिन वाझे यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे एनआयएच्या कार्यालयात मध्यरात्री डॉक्टरांना पाचारण करण्यात आले होते. साधारण एक वाजण्याच्या सुमारास हे डॉक्टर एनआयएच्या कार्यालयातून बाहेर पडले.
वाचा :-पोलीस कोठडीत असलेले सचिन वाझे यांचं मुंबई पोलीस खात्यातून निलंबन
त्यानंतर सोमवारी दुपारी पुन्हा वाझे यांची प्रकृती खालावल्याचे समजते. एनआयएच्या कार्यालयात उपचार करणे शक्य नसल्याने त्यांना जे.जे. रुग्णालयात नेण्यात आल्याचे समजते. यापूर्वी शनिवारी रात्रीही सचिन वाझे यांची प्रकृती खालावली होती. एनआयएने त्यांची सलग 13 तास चौकशी केली होती. त्यामुळे सचिन वाझे यांना थकवा जाणवायला लागला होता. त्यामुळे सचिन वाझे मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात गेले होते. याठिकाणी त्यांना सलाईन लावण्यात आले होते, अशी माहितीही सूत्रांनी दिली होती. त्यानंतर आता सलग दुसऱ्या दिवशी सचिन वाझे यांच्यावर डॉक्टर बोलावून उपचार करण्याची वेळ आली आहे. सचिन वाझे यांच्या चौकशीत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून NIA कडून त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे