रतन टाटा यांच्या मृत्यूपत्राने उद्योगजगताला एका मागून एक धक्के
500 कोटींची संपत्ती एका अनोळखी व्यक्तीला देण्याचे सांगण्यात आले आहे.

मुंबई : रतन टाटा यांच्या मृत्यूपत्राने उद्योगजगताला एका मागून एक धक्के बसले आहेत. या मृत्यूपत्रात एका अनोळखी व्यक्तीला 500 कोटींची संपत्ती देण्यास सांगण्यात ले आहे. त्यामुळे सर्वसामान्यच नाही तर टाटा कुटुंबियातील लोकांना सुद्धा मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत टाटा यांच्यासोबत सार्वजनिक रूपात ही व्यक्ती तितकीशी चर्चेत नव्हती. पण या व्यक्तीचे जवळपास 60 वर्षांपासून रतन टाटा यांच्याशी सौहार्दपूर्ण संबंध होते. तिचे नाव वाचून अनेकांना झटका बसला. याविषयीची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. कोण आहे ती अनोळखी व्यक्ती? Mystery Man चे नाव तरी काय?
कोण आहे ती व्यक्ती?
रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रात एका व्यक्तीला 500 कोटी रुपये संपत्ती देण्यास सांगण्यात आल्याचे समोर येत आहे. ही व्यक्ती जमशेदपूर येथील आहेत. ट्रॅव्हल क्षेत्रातील उद्योजिका मोहिनी मोहन दत्ता यांना ही लॉटरी लागली आहे. हा टाटा कुटुंबियांना सुद्धा धक्का मानण्यात येत आहे. माध्यमातील वृत्तानुसार, दत्ता आणि त्यांच्या कुटुंबाकडे ट्रॅव्हल एजन्सी स्टॅलियनमध्ये मालकी होती. 2013 मध्ये ही एजन्सी ताज ग्रुप ऑफ होटल्सच्या ताज सर्व्हिसेज मध्ये विलीन करण्यात आले होते.
मोहिनी दत्ता आणि त्यांच्या कुटुंबाकडे स्टॅलियनमध्ये 80% वाटा होता. तर उर्वरीत हिस्सा हा टाटा समूहाकडे होत. मोहिनी यांनी थॉमस कुकची सहकारी कंपनी टीसी ट्रॅव्हल सर्व्हिसेजचे संचालक म्हणून सुद्धा काम पाहिले आहे.
हेही वाचा : प्रस्तावित ‘‘शिवनेरी’’ जिल्हाच्या मागणीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार- आमदार महेश लांडगे आमने-सामने!
अधिकाऱ्यांनी नाही दिली प्रतिक्रिया
रतन टाटा यांना अगदी जवळून पाहणाऱ्या लोकांनी सांगितले की, दत्ता या दीर्घकाळापासून रतन टाटा यांच्या सहकारी होत्या, त्यांच्या कुटुंबाशी त्यांचे चांगले संबंध होते. ईटीच्या वृत्तानुसार, त्यांनी मोहिनी दत्ता यांच्याशी यासंबंधी संपर्क साधला असता, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर मृत्युपत्राचे वाचन करणारे कार्यकारी अधिकारी आणि रतन टाटा यांची चुलत बहिणी शिरीन आणि डीना जेजीभाय यांनी सुद्धा प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर डेरियस खंबाट यांनी सुद्धा कोणतीची टिप्पणी केली नाही. अधिकारी मेहली मिस्त्री यांनी याप्रकरणी कोणीही प्रतिक्रिया देण्यास तयार नसल्याचे ईटीला सांगितले. दत्ता यांना दोन मुली आहेत. त्यापैकी एकीने 2024 पर्यंत, 9 वर्षांपर्यंत टाटा ट्रस्टमध्ये काम केले होते. तिने त्यापूर्वी ताज हॉटेल समूहात काम केले होते.