TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

साप्ताहिक सुट्टय़ांसाठी परिचारिकांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा ; संघटनांची महापालिकेला एका आठवडय़ाची मुदत

मुंबई : महापालिकेच्या केईएम, नायर आणि शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाप्रमाणेच महापालिकेच्या उपनगरी आणि विशेष रुग्णालयांतील परिचारिकांनाही दर महिन्याला आठ सुट्टय़ा मिळाव्यात या मागणीसाठी गेल्या आठवडय़ात आंदोलन केले होते. त्यानंतर प्रशासनाने प्रायोगिक तत्त्वावर अशा सुट्टय़ा देण्याचे मान्य केले होते. मात्र त्याबाबतचा आदेश न निघाल्यामुळे सर्व परिचारिकांनी २६ सप्टेंबर रोजी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

महापालिकेच्या १६ उपनगरी रुग्णालये, विशेष रुग्णालये आणि प्रसूतिगृहात काम करणाऱ्या परिचारिकांना आठ साप्ताहिक सुट्टय़ा मिळत नाहीत. त्यामुळे या मागणीसाठी गेल्या आठवडय़ात शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयातील परिचारिकांनी आंदोलन केले होते. त्यानंतर कस्तुरबा रुग्णालयातील परिचारिकांनीही आंदोलन केले. म्युनिसिपल मजदूर युनियनच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button