ताज्या घडामोडीमुंबई

महापालिका निवडणूक कधी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ऑक्टोबरनंतर होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुका पार पडल्या. विधानसभा निवडणुकांचा निकाल नोव्हेंबरमध्ये लागला होता. या निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणूक कधी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. त्यातच आता महापालिका निवडणुकीबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील महापालिका निवडणुका येत्या ऑक्टोबर महिन्यानंतरच लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा  :  हवा प्रदूषणासाठी कारणीभूत दोन आरएमसी प्लँट चालकाला ‘दणका’

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ऑक्टोबरनंतर होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. महापालिका निवडणुकीसंदर्भात येत्या 4 मे रोजी सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल दिला तरी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ऑक्टोबरनंतरच लागणार असल्याचे बोललं जात आहे.

मे महिन्यात निकाल लागला तरी देखील महानगरपालिका पावसाळ्यापूर्वी होणार नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निकाल लागल्यानंतर जवळपास 100 दिवस प्रशासकांना निवडणुकीची तयारी करायला वेळ लागणार आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची आणि राज्य निवडणूक आयोगाची नुकतीच बैठक पार पडली. यावेळी निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. कोर्टाने निकाल दिल्यानंतर पालिकेला जवळपास 100 दिवस आढावा आणि तयारीसाठी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये वॉर्ड रचना, यादी तपासणी, हरकती मागवने, आरक्षण सोडत या बाबींचा समावेश असणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button