मुंबईकरांनो, काळजी घ्या… पारा 40 अंशांवर जाणार!
पूर्वोत्तर समुद्री वाऱ्यांमुळे हे तापमान तापमानात वाढ
![Mumbaikars, beware… mercury will touch 40 degrees!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Mumbhai-780x470.jpg)
मुंबई: राज्यात एकीकडे उकाडा वाढला असतानाच मुंबईत 20, 21 आणि 22 मार्च रोजी उष्णतेचा पारा 39 अंश सेल्सिअसवर जाणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुंबईत सध्या 32-34 अंश सेल्सिअस तापमान आहे. पूर्वोत्तर समुद्री वाऱयांमुळे हे तापमान 20, 21 आणि 22 मार्च रोजी अचानक 39 अंश सेल्सिअसवर जाणार आहे.
राज्यात एकीकडे उकाडा वाढला असतानाच मुंबईत 20, 21 आणि 22 मार्च रोजी उष्णतेचा पारा 39 अंश सेल्सिअसवर जाणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबईत सध्या 32-34 अंश सेल्सिअस तापमान आहे. पूर्वोत्तर समुद्री वाऱयांमुळे हे तापमान 20, 21 आणि 22 मार्च रोजी अचानक वाढण्याची शक्यता आहे. तापमान 36 ते 39 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते.
– सुषमा नायर, कुलाबा वेधशाळा