मुंबईतील शाळा १५ डिसेंबरला उघडणार!
![Schools in Pune, Pimpri Chinchwad starting from today, school bells will ring after one and a half years](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/school-759-1-2.jpg)
मुंबई – राज्यातील शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या असल्या तरी त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी जिल्ह्याच्या स्थानिक पातळीवर देण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईतील शाळा उद्यापासून नाही, तर १५ डिसेंबरला उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत पहिली ते सातवीच्या शाळा आता पंधरा डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. शाळा सुरू होईपर्यंत ऑनलाईन वर्ग सुरूच राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पहिली ते सातवीचे सुमारे ११ लाख ७२ हजार ४२५ विद्यार्थी तब्बल २० महिन्यांहून अधिक काळानंतर शाळेत पहिले पाऊल ठेवणार आहेत. यात मुंबई महानगरपालिकेच्या २ हजार ५४१, तर उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या १ हजार ८०२ शाळांतील विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे. दरम्यान, मुंबईत शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत पालिका आयुक्त आणि शिक्षणाधिकारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत १५ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.