Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#coronovirus:मुंबई पोलिसातील कॉन्स्टेबलचा कोरोनाने मृत्यू

मुंबई : कोरोनाच्या कचाट्यात पोलीस आणि वैद्यकीय सेवेतील कर्मचारीही आहेत. कोरोनाचा कहर वाढत असतानाच, मुंबईत एका 57 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. संबंधित पोलीस मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत होता. तर वरळी इथला रहिवासी होता.

संंबंधित पोलिसाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. मृत पोलीस कॉन्स्टेबलच्या मागे पत्नी, दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार आहे.

राज्यात 96 पोलिसांना कोरोना

दरम्यान महाराष्ट्रात आतापर्यंत 96 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. 96 पोलिसांत 15 अधिकाऱ्यांचा आणि 81 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गृहमंत्रालयातील अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button