ताज्या घडामोडीमुंबई
येस बँक गैरव्यवहार प्रकरणातील गौतम थापरला मुंबई उच्च न्यायालयात जामीन मंजूर
मुंबई | ३०७ कोटींच्या येस बँक गैरव्यवहार प्रकरणातील अवंता समूहाचे प्रवर्तक गौतम थापर यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने त्यांना २ लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
येस बँक गैरव्यवहार प्रकरणी बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्यासह अन्य आरोपींविरोधात सीबीआयने गुन्हे नोंदवले आहेत. या प्रकरणात अवंता समूहाचे गौतम थापर हेदेखील आरोपी आहेत. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने तो मंजूर केल्यामुळे त्यांना जामीन मिळाला.