गुंतवणुकदारांना संधी! गुजरात पॉलिसोल केमिकल्स लिमिटेडचा आयपीओ येणार

कोरोना आणि त्यानंतर रशिया-युक्रेन युद्धाचा फटका शेअर बाजारांना बसला होता. मात्र आता परिस्थितीत सुधारणा होत असल्याची चिन्हे दिसत आहेत. याचाच एक भाग म्हणजे गुजरातमधील रासायनिक कंपनी गुजरात पॉलिसोल केमिकल्स लिमिटेड आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी कंपनीने सेबीकडे कागदपत्रे सादर केली आहेत. आयपीओतून ही कंपनी ४१४ कोटींचे भागभांडवल उभारणार आहे.
गुजरात पॉलिसोल आयपीओ अंतर्गत ८७ कोटी किंमतीचे नवीन समभाग जारी करणार आहे. कंपनीचे प्रवर्तक ३२७ कोटींचे समभाग विक्रीसाठी ऑफर देणार आहेत. यातून जमा झालेल्या पैशांमधून कंपनी कर्जांची परतफेड करणार असून कार्पोरेट आणि सामान्यांची उद्दिष्ट पूर्ण करणार आहे. गुजरातमधील ही कंपनी सुविधा-तंत्रज्ञान, रंग आणि रंगद्रव्ये पुरवठादारांपैकी एक केमिकल कंपनी आहे.
दरम्यान, शेअर बाजारात सध्या आयपीओंना अच्छे दिन आले आहेत. ६५ कंपन्यांनी आयपीओतून १.३५ लाख ४१४कोटींचे भांडवल जमा केले आहे. त्यामुळे आता अनेक कंपन्या आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत. मात्र सध्या मुंबई शेअर बाजार गुजरात पॉलिसोलचा आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे.