TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

नागपूर समृद्धी महामार्गातील नागपूर – शिर्डी या पहिल्या टप्प्याचे दिवाळीपूर्वी उद्घाटन करण्याचे नियोजन राज्य सरकारने केल्याची माहिती समोर 

नागपूर समृद्धी महामार्गातील नागपूर – शिर्डी या पहिल्या टप्प्याचे दिवाळीपूर्वी उद्घाटन करण्याचे नियोजन राज्य सरकारने केल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार पंतप्रधानांची वेळ घेण्यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

दुसरीकडे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळही (एमएसआरडीसी) तयारीला लागल्याचे समजते. महत्त्वाचे म्हणजे उद्घाटनासाठी १६ वा २३ ऑक्टोबर अशा दोन तारखा ठरविण्यात आल्या आहेत. पंतप्रधानांकडून वेळ निश्चित झाल्यानंतर यासंबंधीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, १६ ऑक्टोबरला उद्घाटन होण्याची शक्यता आहे.मुंबई – नागपूरदरम्यानचे ७०१ किमीचे अंतर समृद्धी महामार्गामुळे केवळ आठ तासात पार करता येणार आहे. मात्र या प्रकल्पाचे काम रखडल्याने प्रकल्प पूर्णत्वास विलंब होत आहे.

पहिल्या टप्प्यातील काही भागाचे काम १०० टक्के पूर्ण झाल्याने २ मे रोजी नागपूर – शेलू बाजार असा २१० किमीच्या मार्गाचे उद्घाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याची तयारीही झाली होती. मात्र, उद्घाटनास दोन दिवस शिल्लक असतानाच प्रकल्पात मोठी दुर्घटना घडली आणि उद्घाटन रद्द झाले. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले; उद्घाटनाचा विषय मागे पडला. पण आता शिंदे-फडणवीस सरकारने समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा घाट घातला आहे. महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एमएसआरडीसीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर – शेलू बाजारऐवजी आता नागपूर – शिर्डी टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी १६ आणि २३ ऑक्टोबर अशा दोन तारखा निश्चित करण्यात आल्या असून पंतप्रधान कार्यालयाकडून तोंडी होकार मिळाला आहे. १६ ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आल्याचे समजते. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून लेखी कळविण्यात आल्यानंतरच उद्घाटनाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असल्याचे अधिकऱ्यांनी सांगितले. याबाबत एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्याकडे विचारणा केली. मात्र त्यांची कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button