ताज्या घडामोडीमुंबई

देशात NEET परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणावरून वातावरण चांगलंच तापलं

पेपर फुटी प्रकरणाता दोषी आढळणाऱ्यां विरोधात मोठी कारवाई

मुंबई : देशात NEET परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. पावसाळी अधिवेशनातमध्ये सरकारी नोकऱ्यांमधील भरती आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली होती. मात्र आता पेपर फुटी करणाऱ्यांवर मोठी कारवाई होणार आहे. राज्य सरकारने पेपरफुटीला आळा घालणारं विधेयक मांडलं आहे. यामध्ये अपराध करणाऱ्या व्यक्तीला एक कोटींचा दंड होणार आहे. इतकंच नाहीतर तुरूंगातही सडावं लागणार आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबतचं विधेयक मांडलं आहे.

राज्य सरकारने पेपरफुटीला आळा घालण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. विधानसभेतील पावसाळी अधिवेशनामध्ये एक विधेयक मांडलं असून या प्रकरणामध्ये दोषी सापडणाऱ्याला 3 ते 10 वर्षांची शिक्षा तसंच १ कोटी रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. पेपर लीक होत आहेत हे थांबवण्यासाठी काही कडक कायदा करणार का? असा सवाल विरोधकांकडून करण्यात आला होता. यावर उत्तर देताना अधिवेशनात कायदा आणणार आहोत असं सांगितलं होतं.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
केंद्राने पेपरफुटीबाबत कायदा केला आहे. राज्यातील मागील सरकारनेही असाच कायदा करण्याचा निर्णय घेतला होता. ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी माझी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाली, त्यावेळी मी त्यांना सांगितले की, आम्हाला यासंदर्भात कायदा आणायचा आहे आणि आम्ही या अधिवेशनात कायदा आणणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button