ताज्या घडामोडीमुंबई

मार्च महिन्यातील अर्थसंकल्पानंतर पैसे महिलाच्या खात्यात जमा

राज्य सरकारची लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी

मुंबई : राज्य सरकारची लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी दिली आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यात २१०० रुपयांच्या हप्त्याची रक्कम नेमकी कधी पडणार याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. येत्या मार्च महिन्यातील अर्थसंकल्पानंतर हे पैसे महिलाच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. ही योजना बंद करण्याची कोणतीही योजना नसल्याचे देखील जलसंपदा मंत्र्‍यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – ‘अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार’; मंत्री आदिती तटकरेंचं वक्तव्य

मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्य सरकारने विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहिण योजना सुरु केली होती. ही योजना जून महिन्यांपासून सुरु झाली आहे. या योजनेत आता १५०० च्या ऐवजी २१०० रुपयांचा हप्ता देण्याचे आश्वासन राज्य सरकारने निवडणूकाच्या जाहीरनाम्यात दिले होते. त्याची पूर्णता अर्थसंकल्पाची मांडणी झाल्यानंतर होणार आहे. आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते मिळालेले आहेत. आता डिसेंबर महिन्याचा लाडक्या बहिणीच्या खात्यावर पडण्यास सरुवात झाली आहे. आता २१०० रुपयाचा हप्ता थेट मार्च महिन्यातील अर्थ संकल्पानंतर मिळणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button