Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

कस्तुरबा रुग्णालयात गॅस गळती, रुग्णांना तातडीने बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू

मुंबई – चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात गॅस गळती झाल्याचं समोर आलं आहे. याठिकाणी LPG गळती झाली असून अग्निशमन दलाच्या 4 गाड्या आणि 3 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्याच महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होत असलेल्या ई बसेस लोकार्पण सोहळा सोडून, रुग्णालयाकडे धाव घेतली.

सकाळी ११.३० चा दरम्यान रुग्णालय परिसरात गॅसचा वास येत होता. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तातडीने त्याबाबत अग्निशमन दलाला माहिती दिली. ही माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलानेही कोणताही विलंब न लावता, कस्तुरबा रुग्णालयाकडे धाव घेतली. तसेच रुग्णालयातील रुग्णांना तातडीने बाहेर काढलं जात आहे.

दरम्यान, अग्निशमन दालच्या चार गाड्या आणि 3 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने इथे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button