Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘नूतन इमारतीच्या बांधकामासाठी निधीची कमतरता जाणवणार नाही’; मंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : राज्य शासनाकडून सुधारीत मान्यतेनुसार सुमारे 330 कोटी रुपये खर्च करून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (कोल्हापूर) च्या प्रांगणामध्ये विविध इमारती उभा करण्यात येत आहेत .या अत्याधुनिक इमारतींच्या उभारणीसाठी आवश्यक तो निधी शासनामार्फत दिला जाईल,निधीची कमतरता अजिबात जाणवणार नाही.अशी नि:संदिग्ध ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली .

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नेचर पार्क या ठिकाणी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मनपा आयक्त डॉ राजेंद्र भारूड , उच्च तंत्र शिक्षण संचालक डॉ विनोद मोहितकर , सह संचालक डॉ दत्तात्रय जाधव , प्राचार्य कॅप्टन नितीन सोनजे ,समन्वयक रणजीत सावंत ,डॉ किरण कोळेकर,विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता एच.डी.कट्टी आदी उपस्थित होते .

हेही वाचा –  ‘भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा कायापालट होणार; पुढील वर्षी कुंभमेळ्यापूर्वी ९० टक्के काम पूर्ण होईल’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ते पुढे म्हणाले,या नूतन इमारतीत पाणी पुरवठ्याच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग 4 कोटी तर उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने 5 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी कायम स्वरूपी पाणीपुरवठ्याची सोय केली जाईल.तसेच एमपीएससी मार्फत उच्च तंत्र शिक्षण विभागात सुमारे साडे तीनशे प्राध्यापकांची भरती करण्यात आली आहे .या प्रक्रियेला लवकरच अंतिम स्वरूप मिळेल असे सांगून,कोल्हापूरच्या शासकीय महाविद्यालयाचा दर्जा अतिशय चांगला असल्याचे निरीक्षणही त्यांनी याप्रसंगी नोंदविले . या आढावा बैठकीनंतर मंत्री चंद्रकांत दादा यांनी शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर येथे स्थापन करण्यात आलेल्या उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन केले.राज्यात तंत्रनिकेतन स्तरावर कोल्हापूर येथे शासकीय तंत्रनिकेतन या ठिकाणी एकमेव उत्कृष्टता केंद्र उभारण्यात आले आहे.

या केंद्रासाठी राज्य शासनाने अत्याधुनिक हार्डवेअर,सॉफ्टवेअर व प्रशिक्षण सुविधांसाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला असून त्याद्वारे तीन अत्याधुनिक प्रयोगशाळा येथे विकसीत करण्यात आल्या आहेत.यावेळी मनपाचे जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्यासह शासकीय व तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे इतर प्राध्यापक – कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button