Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त दहिसरमध्ये पेट्रोल, डिझेलचे मोफत वाटप

दहिसर – देशभरात पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडलेले असतानाच दहिसरमध्ये शिवसेनेने चक्क 1 लिटर पेट्रोल-डिझेलचे मोफत वाटप करून वाहन चालकांना सुखद धक्का दिला. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेने या उपक्रमाचे आयोजन केले होते.

दहिसर शिवसेना शाखा क्रमांक 1 च्या वतीने आज बोरिवली पश्चिमेकडील आयसी कॉलनी पेट्रोल पंपावर सकाळी वाहन चालकांना 1 लिटर पेट्रोल आणि डिझेल मोफत देण्यात आले. शिवसेना उपनेते आणि म्हाडाचे सभापती डॉ. विनोद घोसाळकर यांच्या हस्ते 1 लिटर मोफत पेट्रोल- डिझेलचे वाटप यावेळी करण्यात आले. याप्रसंगी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर, उपविभागसंघटक शकुंतला शेलार, शाखाप्रमुख राजेंद्र इंदुलकर, शाखा संघटक ज्यूडीथ मेंडोसा उपस्थित होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button