Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

“वाघाच्या मिशीला हात लावायलाही हिंमत लागते, या…मी वाट पाहतोय”; चंद्रकांत पाटलांना ओपन चालेंज!

मुंबई |

“वाघाच्या मिशीला हात लावयला देखील हिंमत लागते, या मी वाट बघतोय..” असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना उद्देशून म्हटलं आहे, ते नाशिक येथे पत्रकारपरिषदेत बोलत होते. पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला आणि संजय राऊत यांना देखील टोला लगावला होता. या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर आज संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आपण महाराष्ट्रातील राजकारणी आहोत, एक संस्कृती आहे. शुभप्रसंगी आपण नेहमी तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होवोत, अशा शुभेच्छा देत असतो.

हा संस्कार महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण यांच्यापासून बाळासाहेब ठाकरे प्रत्येक प्रमुख नेत्याने राजकीय कार्यकर्त्यांवर केलेला आहे. हे काही शत्रूत्व टोकाचं नसतं. ही काय चंबळच्या खोऱ्यातील डाकूंची लढाई नाही. राजकारणात मतभेद असतात, पण त्यांच्या घरात एखादा मंगलप्रसंग असेल तर आपण त्यांना शुभेच्छा देतच असतो ना? यामध्ये राजकारणचा काय प्रश्न? मी असं म्हणालो की चंद्रकांत पाटील हे एक निरागस, निष्पाप व निषकपट व्यक्तिमत्व आहे. लहान मुलासारखं त्याचं मन आहे, अशा व्यक्तीला आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत की तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होवोत, त्यांचा जन्मदिवस आहे ” असं संजय राऊत यांनी यावेळी बोलून दाखवलं.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button