‘डॉ. आंबेडकरांनी जनसामान्यांच्या वेदनेला आवाज देण्याचे काम मुंबईनगरीतून केले’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय चळवळीचे अनुष्ठान मुंबईत केल्याचे पाहायला मिळते. मुंबई प्रांताच्या विधीमंडळामध्ये जेव्हा बाबासाहेब गेले, तेव्हा शोषीत, पीडित, जनसामान्यांच्या दु:खाला, वेदनेला आवाज देण्याचे काम याच मुंबईच्या महानगरीतून त्यांनी केले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा – ‘काँग्रेसने स्वत:च्या फायद्यासाठी वक्फचे नियम बदलले’; नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
ते पुढे म्हणाले की, खोट्या प्रथा, गुलामगिरीचा पगडा असलेल्या वतनाबाबत त्यांनी ठोस निर्णय घेण्यास याच नगरीतून भाग पाडले. त्यांनी आपल्या स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना मुंबईतच केली. मुंबईच्या भायकळा मतदारसंघातून त्यांनी १९३७ मध्ये प्रांतिक विधानसभेची निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकली. जगातील सर्वोत्कृष्ट संविधान बाबासाहेबांनी देशाला दिले.