देशातील गरिबांच्या संख्येत मोठी घट, भारतातील गरीबी घटली
मोदी सरकारचं मोठं यश! आता फक्त ‘इतके’ लोक गरीब

मुंबई : गेल्या ११ वर्षांपासून केंद्रात भाजपप्रणित सरकार आहे. या काळात भारताने गरीबीवर विजय मिळवल्याची माहिती समोर आली आहे. देशातील गरिबांच्या संख्येत मोठी घट झाली आहे याची आकडेवारी जागतिक बँकेने सादर केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
जागतिक बँकेचा अहवाल
जागतिक बँकेने सादर केलेल्या अहवालानुसार, भारतातील गरिबीत राहणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. भारतात २०११-१२ मध्ये गरीब लोकांची टक्केवारी २७.१ टक्के होती, ती २०२२-२३ मध्ये ५.३ टक्के झाली आहे. त्यामुळे आता भारतात केवळ ५.३ टक्के लोक गरीब आहेत.
जागतिक बँकेने गरिबीची व्याख्या बदलली असून जो व्यक्ती प्रतिदिन तीन डॉलरपेक्षा कमी कमावतो ते गरीब गणला जातो. जागतिक बँकेने अहवालात म्हटले आहे की, २०१७ ते २०२१ दरम्यान भारताचा महागाई दर थोडा जास्त होता. त्यामुळे गरिबीची २०२१ मधील २.१५ डॉलर मर्यादा १५ टक्क्यांनी वाढून ३ डॉलर करण्यात आली आहे.
हेही वाचा – राज्य सरकार लवकरच ‘सीएसआर बोर्ड’ तयार करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
मोफत रेशनमुळे गरिबी हटली
समोर आलेल्या माहितीनुसार, मोफत रेशन योजनेमुळे भारतातील गरीबी कमी झाली आहे. जागतिक बँकेच्या अहवालात असे म्हटले आहे की, ५४ टक्के गरीब लोक पाच सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये राहतात. मात्र गरीबीची ही आकडेवारी आगामी काळात बदलण्याची शक्यता आहे.
जागतिक बँकेच्या मते, गेल्या दशकात भारतातील गरिबीत लक्षणीय घट झाली आहे. भारतातील गरिबी (दररोज $2.15 पेक्षा कमी उत्पन्नावर जगणे) 2011-12 मध्ये 16.2 टक्क्यांवरून 2022-23 मध्ये 2.3 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. तसेच ग्रामीण भागातील गरिबी 18.4 टक्क्यांवरून 2.8 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे आणि शहरी भागात ती 10.7 टक्क्यांवरून 1.1 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे, ज्यामुळे ग्रामीण-शहरी अंतर 7.7 टक्क्यांवरून 1.7 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे.
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने जागतिक बँकेच्या अहवालावर एक पत्रक जारी करत म्हटले की, देशातील अति गरिबी १८.४ टक्क्यांवरून १.७ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. यामुळे १७१ दशलक्ष लोक या रेषेच्या वर आले आहेत. मात्र जगाचा विचार करता, जागतिक स्तरावर गरिबांची संख्या १२५ दशलक्षने वाढली, तर भारतात ही संख्या कमी झाली ही समाधानकारक बाब आहे.