Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

To The Point: भाजपामधून NCP मध्ये गेले अन्‌ सपाटून आपटले!

भोसरी विधानसभा मतदार संघातील ‘केस स्टडी’ : आमदार महेश लांडगे यांच्यावर केलेली टीका भोवली?

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत (NCP) मध्ये उड्या मारणाऱ्यांना चांगलाच फटका बसला. किंबहुना, भोसरी विधानसभा मतदार संघातील एक अपवाद वगळता सर्व माजी नगरसेवक पराभूत झाले आहेत. आमदार महेश लांडगे यांच्यावर टीका करीत ज्यांनी-ज्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. त्यांना अक्षरश: सपाटून मार खावा लागला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक चुरशीची झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपाचे आमदार महेश लांडगे अशी ही लढत संपूर्ण राज्यात गाजली. आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, शेवटी भाजपाने बाजी मारली.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या एकूण १२८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक यश संपादन करत तब्बल ८४ जागा जिंकल्या. यामध्ये ८४ (पुरुष 42, महिला 42) निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी ४४ (पुरुष 18, महिला 26) नगरसेवक पहिल्यांदाच सभागृहात प्रवेश करत आहेत.

विशेष बाब म्हणजे, एकूण 9 (पुरुष 8, महिला 1) नगरसेवक इतर पक्षांतून भाजपमध्ये येऊन निवडून आले, यावरून विरोधी पक्षातील कार्यकर्ते व नेतेही भाजपाच्या विचारधारेवर आणि सत्ताकेंद्रावर विश्वास व्यक्त करत असल्याचे स्पष्ट होते. हा कल आगामी काळातील राजकीय समीकरणांवर निर्णायक प्रभाव टाकणारा ठरेल.

मात्र, काही नगरसेवकांनी आमदार महेश लांडगे यांना ‘टार्गेट’ केले आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामध्ये  ज्ञानेश्वर बोऱ्हाडे, वसंत बाेराटे, लक्ष्मण सस्ते, प्रियांका बारसे यांच्यासह सीमा सावळे, आशा शेंडगे, संजय नेवाळे, भीमा बोबडे, एकनाथ पवार, मारुती जाधव, सारिका लांडगे यांचा समावेश आहे. यापेकी आशा शेंडगे आणि एकनाथ पवार यांना तिकीट मिळाले नाही. तर, भीमा फुगे यांना प्रभाग बदलावा लागला. त्यांनी ज्यांचा पराभव केला. त्या अनुराधा गोफणे या मुळच्या राष्ट्रवादीच्याच आहेत. एकनाथ पवार एकेकाळी महेश लांडगे यांची विधानसभेचे प्रतिस्पर्धी होते. त्यांनाही आता भाजपाने ‘कॉर्नर’ केले आहे.

महेश लांडगे आता शहराचे नेते…

पिंपरी-चिंचवड शहराचे नेते म्हणून आता महेश लांडगे यांना लोकमान्यता मिळाली. अत्यंत प्रतिकूल झालेल्या या निवडणुकीत महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडकरांचा स्वाभिमान जागृत केला. प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महेश लांडगे यांच्यावर थेट टिका केली आणि ही निवडून अजित पवार विरुद्ध महेश लांडगे अशी झाली. महेश लांडगे यांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये हा ‘टर्निंग पॉईंट’ ठरला आहे. स्व. आण्णासाहेब मगर, दिवंगत प्रा. रामकृष्ण मोरे, दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्यानंतर आता आमदार महेश लांडगे पिंपरी-चिंचवड शहराचे नेते झाले आहेत. किंबहुना, भारतीय जनता पार्टीच्या शहरातील निर्णय प्रक्रियेमध्ये महेश लांडगे ‘डिसिझन मेकर’ च्या भूमिकेत दिसणार आहेत. सुमारे 40 वर्षांनंतर आता शहराला स्थानिक नेतृत्त्व प्राप्त झाले आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button