breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: पनवेलमधील रुग्णालयातील डॉक्टर, रुग्णांना कोरोनाची लागण

पनवेल येथील खांदेश्वर वसाहत भागातल्या अष्टविनायक रुग्णालयातील डॉक्टर आणि रुग्णांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सोमवारी सायंकाळी ही बाब उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

रविवारी याच रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाला करोनाची बाधा झाल्याचे उघड झाल्यानंतर पालिकेने तत्काळ रुग्णालयातील कर्मचारी, डॉक्टर आणि इतर रुग्णांची करोना तपासणी करण्याची मोहीम राबविली होती.

याच तपासणी मोहीमेत सोमवारी रुग्णालयाचे डॉक्टर आणि अजून एका रुग्णाला करोनाची बाधा झाल्याचे उजेडात आले. यामुळे खांदेश्वरमध्ये एकच खळबळ माजली आहे.

दरम्यान, अष्टविनायक रुग्णालयात मागील पंधरा दिवसांपासून ज्या नागरिकांनी उपचार घेतले अशा सर्व नागरिकांना पालिकेच्या आरोग्यविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button