ताज्या घडामोडीमुंबई

मुंबई ; छे,छे,तुंबई !

संपूर्ण राज्यात पावसाचे थैमान ; नागरिकांची दैना ; नदी, नाले, ओढे, बंधारे आणि रस्तेसुद्धा तुडुंब !

मुंबई : गेल्या शंभर वर्षात पडला नव्हता एवढा पाऊस सोमवारी एकाच दिवसात पडला. संपूर्ण राज्यात पावसाने थैमान घातल्यामुळे नागरिकांची दैना उडाली. नदी, नाले, ओढे, बंधारे आणि रस्ते सुद्धा तुडुंब भरून वाहू लागले. मुंबईची अक्षरशः तुंबई झाली.

मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्री ॲक्शन मोडवर..

पावसाचे रौद्ररूप एवढे मोठे होते की लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. नागरीकांच्या बचावासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार ‘ॲक्शन मोड’ मध्ये आले. फडणवीस यांनी पाणी साठलेल्या भागाचे दौरे केले, एकनाथ शिंदे हे ‘वॉर रूम’ मधून सूचना देऊन नियंत्रण करीत होते तर अजित पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले.

पावसामुळे सर्वत्र दाणादाण : हा:हाकार

महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे. पुणे, मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील उर्वरित भागातही प्रचंड प्रमाणात पाऊस कोसळत आहे. मुंबईत तर मान्सूनच्या पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी रेल्वेरुळ पाण्याखाली गेले. काही ठिकाणी इमारती कोसळण्याच्या तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी जीवितहानीदेखील झाली आहे.

पावसाचा जोर आणखी चार-पाच दिवस !

आगामी चार ते पाच दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे सरकारने संपूर्ण यंत्रणा सर्वत्र सतर्क केली असून सर्व प्रकारची मदत नागरिकांना देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

विरारमध्ये महिलेचा मृत्यू

मुसळधार पावसामुळे विरारमध्ये मोठी दुर्घटना घडली. येथे स्लॅबचे प्लास्टर डोक्यावर पडल्याने तीस वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. मलबार हिलमध्ये संरक्षण भिंत कोसळली. ही घटना घडल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांकडून या भागाची पाहणी करण्यात आली. या इमारतीमधील रहिवाशांना स्थलांतरीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा –  “३० मिनिटांनंतर दिली होती पाकिस्तानला माहिती”; कॉंग्रेसच्या आरोपांवर जयशंकर यांचे स्पष्टीकरण

सी एम एस टी ला फटका..

या पहिल्या पावसाचा फटका सीएसएमटी रेल्वे स्थानकालाही बसला. येथे पावसामुळे एक झाड कोसळले आहे. हे झाड पार्किंगमध्ये होते. वाऱ्यामुळे तसेच पावसामुळे हे झाड उन्मळून पडले आहे. त्यामुळे बराच काळ वाहतूक कोंडीही झाली.

धबधब्यात विद्यार्थी अडकले..

नवी मुंबईत खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर धारावीतील काही विद्यार्थी अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात खारघर अग्निशमन दलाला यश आले आहे. येथे पाच जण अडकले होते. उल्हास नदीत तीन गुराखी अडकले होते.

बदलापुरात तुफान पाऊस..

बदलापूरमध्ये आज अवघ्या चार तासात तब्बल १६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उल्हास नदीने इशारा पातळी गाठल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले असून पूरस्थिती निर्माण झाल्यास बारा हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे.

पुण्यात वीज पडून एकाचा मृत्यू

जोदरार पावसामुळे पुण्यातही मोठे नुकसान झाले आहे. मासेमारी करणाऱ्या युवकाच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणाच्या कडेला ही घटना घडली. संतोष गुलाब खांडवे असे या युवकाचे नाव आहे.

पश्चिम महाराष्ट्र, कोकणातही मुसळधार..

पुण्याप्रमाणे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि कोकणाची संपूर्ण किनारपट्टी मुसळधार पावसाने व्यापली आहे. सर्वच ठिकाणी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शेतीची कामे अनेक ठिकाणी अपुरी असल्यामुळे शेतकऱ्यांपुढे एक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

मुंबईत राजकीय आरोपांच्या फैरी!

मुंबापुरीच्या तुंबापुरीवरुन राजकीय वर्तुळात आता आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. मुंबई तुंबण्याला सत्ताधारी जबाबदार असल्य़ाचा आरोप विरोधकांनी केला, तर सत्ताधारी मात्र उद्धव ठाकरेंकडे बोट दाखवत आहेत. मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता होती त्यांनी काय केले असा प्रश्न भाजपा ने विचारला आहे. तर मुंबई सुधारणा करण्याऐवजी भाजपा आणि शिंदे गटाने कमाई केली असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

पावसाची तडाखे बंद एन्ट्री..

पावसाच्या तडाखेबंद एन्ट्रीनं अवघ्या काही तासांत मुंबापुरीची तुंबापुरी करुन टाकली. मुंबईच्या मंत्रालय परिसरापासून ते मेट्रो स्टेशनपर्यंत सग ळे काही पाण्याखाली गेले. मस्जिद स्टेशन परिसराचा तर स्विमिंगपूल झाला होता. मुंबईच्या भुयारी मेट्रोच्या वरळी स्टेशनवर आदित्य ठाकरे पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना तिथे अडवण्यात आले. भुयारी मेट्रोत पाणी शिरल्याने सरकारची पोलखोल झाल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली. पाऊस आणि मुंबईची तुंबई हे जणू समीकरणच बनले आहे. पाऊस आला की मुंबईत ठिकठिकाणी पाणी भरते. त्यामुळे रस्त्यावर काय आणि घरात काय पाणीच पाणी पाहायला मिळते. मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलच्या रुळांवर पाणी झाल्यामुळे लोकलसेवा खोळंबली. तर दुसरीकडे रस्त्यावर देखील पाणी असल्यामुळे नागरिकांची एकच दैना उडाली.

मुंबई ऍट अ ग्लान्स…!

मे महिन्यातच मुंबई पावसामुळे कोलमडली आहे. गेल्या आठवड्यात अंधेरी सबवे आणि साकीनाका पाण्याखाली गेले होते. सोमवारी दक्षिण आणि मध्य मुंबईला महानगरपालिकेच्या कारभाराचा फटका बसला आहे. हिंदमाता आणि गांधी मार्केट हे नेहमीच पावसाळ्यात जलमय होणारे भाग पूर्णपणे पाण्याखाली गेले. वरळीतील मेट्रो स्टेशनची भिंत कोसळली, पाणी साचले, गटाराचे पाणी आत शिरले. केम्प्स कॉर्नरजवळील नव्या रस्त्याची दुरवस्था झाली. केईएम हॉस्पिटल, नेपियन्सी रोड, बीएमसी ची वॉर्ड ऑफिसेस आणि मंत्रालयाजवळसुद्धा पाणी साचले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button