Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

मुख्यमंत्री उच्च न्यायालयात; कारण गुलदस्त्यात

मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उच्च न्यायालयात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उच्च न्यायालयात का दाखल झाले याचे कारण अद्याप कळलेले नाही. मात्र याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री मुख्य न्यायमूर्तींशी चर्चा करु शकतात किंवा राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत चर्चा होऊ शकते, अशा विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सकाळी 11.30च्या सुमारास महाधिवक्ते अभिषेक कुंभकोणी यांच्यासोबत उच्च न्यायालयात दाखल झाले. त्यांच्यासोबत महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहलही उपस्थित असल्याचे समजते. दरम्यान, प्रोटोकॉलनुसार मुख्य न्यायाधीश मुख्यमंत्र्यांची किंवा कोणत्याही मंत्र्यांची भेट घेऊ शकत नाहीत. मात्र मुख्यमंत्री हे प्रोटोकॉलनुसार मुख्य न्यायाधीशांची भेट घेऊ शकतात.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button