मध्य रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक; अनेक लोकल, मेल, एक्सप्रेस रद्द
![Central Railway's Sunday megablock; Many local, mail, express canceled](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/415154-mumbailocal.jpg)
मुंबई | प्रतिनिधी
ठाणे-दिवा दरम्यानच्या डाऊन जलद मार्गावर शनिवारी मध्यरात्रीपासून १४ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक शनिवारी मध्यरात्रीनंतर १ वाजून २० मिनिटांनी सुरू होईल आणि रविवारी दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी संपेल. यामुळे मध्य रेल्वेच्या अनेक लोकल फेऱ्या आणि काही मेल व एक्सप्रेस रद्द केल्या आहेत, अशी माहिती रेल्वेने दिली आहे. या मेगाब्लॉकमध्ये पाचव्या आणि सहाव्या नव्या मार्गिकेचेही काम केले जाणार आहे.
मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्रीनंतर मेगाब्लॉक सुरू होणार आहे. तो रविवारी दुपारी ३.२० पर्यंत चालेल. जलद मार्गावर हा मेगाब्लॉक असल्यामुळे जलद लोकल धिम्या मार्गावरून वळविण्यात येणार आहेत. त्याचा परिणाम लोकलच्या वेळापत्रकावर होणार आहे. त्यामुळे अनेक लोकलच्या फेऱ्या रद्द केल्या असून या मेगाब्लॉकमुळे नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेस, कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस, नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस, मुंबई-पुणे इंद्रायणी, मुंबई-करमळी तेजस, मुंबई-जालना जनशताब्दी आदी गाड्या रद्द झाल्या आहेत, असे रेल्वेने म्हटले आहे.