Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

काळजी घ्या! कोरोनाची ही नवी लक्षणं आली समोर

मुंबई – देशात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट अधिक भयंकर असल्याचं सांगितलं जातं आहे. आता कोरोनाची नवी लक्षणं समोर येत आहेत. सर्दी-खोकला-ताप ही लक्षणं सोडून इतर काही लक्षणं दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करत असाल तर सावध राहा.

कोरोना आता शरीराच्या वेगवेगळ्या अंगावर परिणाम करतो आहे. विशेषतः फुफ्फुसाप्रमाणेच आतड्यांवरही परिणाम करतो आहे. त्यामुळे पोटात तीव्र वेदना होणं हे कोरोनाचं नवं लक्षण आहे. अंग दुखल्यासारखं वाटत असेल म्हणजे स्नायूंमध्ये वेदना होत असतील तर हे कोरोनाचं लक्षण आहे.

पोटदुखी, उलटी, डायरिया, अंगदुखी अशी तक्रार घेऊन आलेले 40 टक्के रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.दरम्यान, गुरूवारी दिवसभरात राज्यात तब्बल 56 हजार 286 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून मृत पावणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं, गुरूवारी 376 रूग्णांचा राज्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत असताना आज हे गंभीर चित्र पाहायला मिळालं. त्याचबरोबर राज्यात सध्या एकूण 5 लाख 21 हजार 317 सक्रिय रूग्णसंख्या आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button