ताज्या घडामोडीमुंबई

आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या ताफ्यामुळे तब्बल 30 मुलांची परीक्षा हुकली

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे JEEची परीक्षा होती

आंध्रप्रदेश : सोमवारी विशाखापट्टणममध्ये JEE या महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षेत बसण्यापासून २५ हून अधिक विद्यार्थांना रोखण्यात आले. हे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचल्याने त्यांना परिक्षेला बसू दिल नसल्याची माहिती समोर येत आहे. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या ताफ्यामुळे वाहतुकीवर बंधने आल्यामुळे विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाला. पेंडुर्थी येथील चिन्नामुसीदीवाडा येथील आयओएन डिजिटल झोन इमारतीत सकाळी 8.30 वाजता परीक्षा सुरू होणार होती. मात्र, विद्यार्थी वेळेत न पोहोचल्याने त्यांना परीक्षेला बसू देण्यात आलेले नाही.

काय दावा आहे?

JEE exam 2025ला बसणाऱ्या एका विद्यार्थ्याची आई बी कलावती यांनी दावा केला की पवन कल्याणच्या ताफ्यासाठी लादलेल्या वाहतूक निर्बंधांमुळे तिच्या मुलाला परीक्षा केंद्रात पोहोचण्यास उशिर झाला. आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो, असे कलावती यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले. पवन कल्याणचा ताफा आराकू जात असल्यामुळे वाहतूक थांबवण्यात आली होती. विद्यार्थिनीच्या आईने सांगितले की ती सकाळी 7.50 वाजता एनएडी जंक्शनवर पोहोचली होती पण परीक्षा केंद्रापर्यंतचे उर्वरित अंतर कापण्यासाठी तिला 42 मिनिटे लागली. परीक्षा केंद्रावर पोहण्यासाठी उशिर झाल्यामुळे त्यांना प्रेवश मिळाला नाही.

हेही वाचा –  ‘इलेक्ट्रिक सोलर व्हेईकल चॅम्पियनशिप’मध्ये पीसीसीओई अव्वल

त्यांनी सांगितले की सुमारे 30 विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. आम्ही वारंवार विनंती केली पण आम्हाला आत जाऊ दिले नाही. दुसरे पालक अनिल कुमार म्हणाले की, परीक्षा केंद्राने पाच मिनिटांची सवलत दिली असती तर त्यांच्या मुलीचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया गेले नसते. पुढे ते म्हणाले की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येत-जात राहतात, पण पोलिसांनी परीक्षा केंद्राला माहिती दिली असती आणि पाच मिनिटे सूट दिली असती तर काय झाले असते?

दोन मिनिटांमुळे प्रवेश मिळाला नाही

अनिल कुमार म्हणाले की, त्यांची मुलगी सकाळी 8.32 वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचली होती तरी तिला दोन मिनिटे उशिरा आल्याने प्रवेश देण्यात आला नाही. माध्यमांशी बोलताना, एका पालकाने उपमुख्यमंत्र्‍यांमुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेला पोहोचायला वेळ झाला त्यांच्यासाठी पुन्हा वेळापत्रक बदलण्याचा विचार करण्याचे आवाहन केले. दरम्यान, विशाखापट्टणम पोलिसांनी एक निवेदन जारी करून विद्यार्थ्यांना झालेला उशिरा हा ताफ्यामुळे झालेला नाही असे म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “हे स्पष्ट आहे की उपमुख्यमंत्र्यांचे सकाळी 8.41 वाजता परिसरातून जात असल्यामुळे विद्यार्थ्यांना उशिरा झालेला नाही. ज्या विद्यार्थांना सकाळी 7 वाजेपर्यंत आणि निश्चितच 8.30 च्या आधी पोहोचायते होते.” याशिवाय, गैरहजर उमेदवारांची संख्या सर्वात कमी असल्याचे पोलिसांनी सांगितले. जनसेना संस्थापकांनी सोमवारी अराकू मतदारसंघाला भेट दिली आणि आदिवासी समुदायांशी संवाद साधला आणि काही रस्ते बांधकाम प्रकल्पांचे उद्घाटन केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button