TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

बनावट शपथपत्रांप्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई : बनावट शपथपत्र तयार केल्याप्रकरणी वांद्रे येथील निर्मल नगर पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला. या कारवाईत चार हजार ६८२ प्रतिज्ञापत्रे पोलिसांना सापडली आहेत. मुंबई पोलिसांनी अशीच कारवाई माहिम व अंधेरी येथेही केली आहे. आरोपींनी बनावट शिक्क्यांचा वापर केल्याचा संशय असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, याप्रकरणात कोणत्या राजकीय पक्षाच्या सहभागाबाबत पोलिसांकडून कोणताही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याबाबत तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

चुनाभट्टी येथील रहिवासी संजय कदम यांच्या तक्रारीवरून निर्मल नगर पोलीस ठाण्यात फसवणूक व बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार वांद्रे न्यायालय परिसरातील एका कार्यालयात हा प्रकार सुरू असल्याचे निष्पन्न झाले. तेथे नोटरीचे काम सुरू होते. पण समोर कोणताही व्यक्ती उपस्थित नसतानाही प्रतिज्ञापत्रावर शिक्के मारण्याचे काम सुरू होते. त्यावेळी कदम यांनी पोलिसांना सांगितले असता तेथील व्यक्तींकडे मोठ्याप्रमाणात प्रतिज्ञापत्र असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांना विचारले असता त्यांच्याकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही, अखेर याप्रकरणी पोलिसांनी त्या नोटरी करणाऱ्या व्यक्तींकडून चार हजार ६८२ प्रतिज्ञापत्र जप्त केली.  आधारकार्डाची प्रत व छायाचित्र मुद्रांकावर चिकटवून बनावट शपथपत्र तयार करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी माहिम व अंधेरी येथेही कारवाई करण्यात आली आहे. या शपथपत्रांचा वापर राजकीय पक्षाकडून करण्यात येत असल्याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button