Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई
येत्या रविवारी मध्य रेल्वेवर २४ तासांचा मेगा ब्लॉक
![24-hour mega block on Central Railway next Sunday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/freepressjournal_import_2018_10_Mega-Block-thane.jpg)
- ठाणे ते कल्याण एकही लोकल थांबणार नाही
मुंबई | प्रतिनिधी
येत्या रविवारी म्हणजेच 2 जानेवारीला मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा मार्गावर 24 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पाचव्या सहाव्या मार्गिगेसाठी हा 24 तासांचा मेगा ब्लॉक असणारआहे.
ठाणे ते कल्याण मार्गावर धीम्या मार्गावर अप आणि डाऊन दिशेला एकही लोकल धावणार नाही. दरम्यान 200 लोकलच्या फेऱ्या रद्द होणार आहेत. तर शनिवार, रविवार आणि सोमवारी मिळून 18 एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. शनिवारी मध्यरात्रीनंतर 2 वाजता हा मेगा ब्लॉक सुरू होईल तर रविवारी रात्री 2 वाजता संपेल. सोमवारी सकाळी सर्व गाड्या सुरू होतील. ब्लॉक दरम्यान ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा या स्थानकांवर एकही लोकल उपलब्ध नसेल. ब्लॉकनंतर कळवा आणि मुंब्रा दरम्यान नवीन बांधलेल्या खाडी पुलावरून धीम्या लोकल धावतील.