…हेच बाबासाहेबांच्या स्मृतीस योग्य अभिवादन ठरेल- राज ठाकरे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/raj-thakare-Frame-copy-3.jpg)
महाईन्यूज | मुंबई
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी झालेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्विटवरुन ट्विट करून बाबासाहेबांना अभिवादन केले आहे.
राज ठाकरेंनी ट्विटवर हॅण्डलवरुन बाबासाहेबांचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी, “स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या मूल्यांची गुंफण करत भारतीय लोकशाहीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचं अभेद्य कवच दिलंत आहे. आज भारतीय लोकशाहीचा कसोटीचा काळ आहे, ह्या काळात बाबासाहेबांनी दिलेल्या मूल्यांसाठी आग्रही राहणं हेच बाबासाहेबांच्या स्मृतीस योग्य अभिवादन ठरेल,” असं म्हटलं आहे. तसेच त्यांनी ट्विटमध्ये “#महामानव” असा हा हॅशटॅगही वापरला आहे.