Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
शौविक, सॅम्युअल पाठोपाठ दीपेशला अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Rhea-2.jpg)
मुंबई | अंमली पदार्थ प्रकरणी शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा पाठोपाठ दीपेश सावंत याला अटक झाली. एनसीबीने ही कारवाई केली. दीपेशला रविवारी सकाळी ११ वाजता कोर्टात हजर केले जाईल.
एनसीबीने अंमली पदार्थ प्रकरणी शौविक, सॅम्युअल, जैदसह सहा आरोपींना अटक केली आहे. यापैकी शौविक, सॅम्युअल, जैद ९ सप्टेंबरपर्यंत एनसीबीच्या कोठडीत आहेत. दीपेश हा अंमली पदार्थ प्रकरणी सुरू असलेल्या कारवाईतील सातवी अटक असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले.
सॅम्युअल मिरांडा आणि शौविक चक्रवर्ती या दोघांविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत कलम ८ क, २० ब, २७ अ, २८ आणि २९ आधारे आरोप ठेवले. यात दोषी आढळल्यास दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. सॅम्युअल मिरांडा आणि शौविक चक्रवर्ती विरोधात एनसीबीने अंमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीचे आर्थिक व्यवहार केल्याचा ठपका ठेवला.