Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी
#CoronaVirus: आरोग्य मंत्री राजेशजी टोपे यांच्या कामात सहकारी सदस्य म्हणून डॉ. सुनील गंधे यांची निवड

जगात कोरोना ने थैमान घातले आहे तसेच मुंबईसह महाराष्ट्रात कोव्हीड १९ रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत माननीय आरोग्य मंत्री राजेशजी टोपे यांच्या कार्याला जखणगांव ता नगर जिल्हा अहमदनगर येथील प्रदिर्घ अनुभवी डॉ सुनील गंधे यांची मदत होईल या हेतूने महाराष्ट्र राज्य कोरोना कंट्रोल रुम मार्फत माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व आरोग्य मंत्री राजेशजी टोपे यांच्या निर्देशानुसार डॉ सुनील गंधे यांची आरोग्य मंत्र्यांचा मदतनीस सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
या निमित्ताने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काम करत असणाऱ्या डॉ सुनील गंधे यांच्यामार्फत सर्व सामान्य जनतेच्या समस्या , भावना व त्यावरील उपाय प्रत्यक्ष मंत्रीमहोदयापर्यत पोहचवण्यात व त्याप्रमाणे कार्यवाही करण्यास मोठी मदत होणार आहे.






