वरळीतून आदित्य ठाकरें ६४,००० मतांनी विजयी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/aditya-thackeray.jpg)
मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या वरळी मतदारसंघाचा निकाल हळूहळू स्पष्ट होऊ लागला आहे. ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आदित्य ठाकरेंनी विजयी झाले आहेत. आदित्य ठाकरेंनी जवळपास ६४ हजार मतांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी आदित्य ठाकरेंनी घेतलेल्या मेहनतीचे फळ त्यांना निकालातून मिळाले आहे.
आदित्य ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक सुरुवातीपासून तेवढी चुरशीची किंवा अटीतटीची नव्हती. आज निकालाचे कल हाती येऊ लागले, तेव्हापासून आदित्य ठाकरे यांनी आघाडी घेतली होती. महाआघाडीकडून काँग्रेसने सुरेश माने यांना आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवारी दिली होती. तर बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनीही आदित्य यांच्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती. त्यामुळे बिचुकलेंना किती मते मिळतील याची सर्वांना उत्सुकता होती. अपेक्षेप्रमाणे बिचुकलेंना आता पर्यंत जवळपास 200 मतं मिळाली आहेत.