Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक, मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र
मुंबई: कोरोना व्हायरसच्या लॉक डाऊननंतर, अनलॉकमध्ये सरकारने मॉल्स उघडण्यास परवानगी दिली, सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती 100 केली होती मात्र सरकार मंदिरे उघडण्याबाबत निरुत्साही आहे. सरकारला मंदिरे उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे? असा सवाल राज ठाकरे यांनी पत्राद्वारे उपस्थित केलेला आहे. राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले असून, याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलेले आहे.