Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन

मुंबई – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज (६ डिसेंबर) ६४ वा महापरिनिर्वाण दिन आहे. दरवर्षी यानिमित्ताने लाखो अनुयायी दादरच्या शिवाजी पार्कवरील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येतात. शिवाजी पार्क मैदान लाखो अनुयायांनी तुडूंब भरलेले असते.
मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर न येता प्रत्येकाने घरात राहून डिजीटल माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन राज्य सरकारसह पालिकेकडून करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.





