Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई
मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर्सवर 1 मार्चपर्यंत बंदी
![Drones, paragliders banned in Mumbai Police Commissionerate area till March 1](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/drone.jpg)
मुंबई – मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 1 मार्चपर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअर क्राफ्ट, एरियल मिसाईल आदी तत्सम उपकरणीय वापरांवर (Flying Activities) बंदी आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.
मुंबई पोलीस उपआयुक्त (संचलन) तथा कार्यकारी दंडाधिकारी एस.चैतन्य यांनी उपरोक्त आदेश निर्गमित केले असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द 188 भा.दं.वि. 1960 नुसार कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.