Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मातोश्रीबाहेर आंदोलनाच्या तयारीत असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलावी, यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी MPSC आणि राज्यसेवा परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर आंदोलनाच्या तयारीत होते. पण काल रात्रीच आबा पाटील आणि काही कार्यकर्त्यांना नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले.

विशेष म्हणजे काल संध्याकाळी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी एमपीएससी कार्यालयाबाहेर आंदोलन केले होते. त्याच दरम्यान कोल्हापूरच्या मराठा कार्यकर्त्यांना नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त पोलीस तैनात केले गेले आहेत. मातोश्रीवरील आंदोलनापूर्वीच मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पहाटे 4 वाजता ताब्यात घेऊन त्यांना पुण्यात सोडण्यात आले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा ठरल्याप्रमाणे 11 ऑक्टोबरलाच होणार असून, राज्यातील अडीच लाख विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रही देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आयोगानं 16 सप्टेंबरला सरकारला विचारणा केल्यानंतर परीक्षेचे नियोजन केले असल्याचं सांगितलं आहे. आरक्षणाच्या निर्णयानंतर आणि कोरोनावरची लस उपलब्ध झाल्यानंतरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा घ्यावी, अशी मागणीही केली जात आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button