Breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय
महाराष्ट्रात न दिसलेले चित्र बिहारमध्ये दिसेल- प्रकाश आंबेडकर

मुंबई: आम्ही देशात नवे राजकारण करु इच्छितोय. त्याची सुरुवात आम्ही महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत केलेली आहे. आम्ही (वंचित बहुजन आघाडी) आणि AIMIM आघाडी केलेली आहे. हा प्रयोग पुढेही कायम राहावा असा उद्देश होता. परंतू, तो सफल झालेला नाही. परंतू, जे महाराष्ट्रात होऊ शकले नाही ते बिहारमध्ये होऊ शकते, असे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेले आहे.





