Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
‘मरकज’वालेच नियम मोडतात असं नाही: शिवसेना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/5-1.jpg)
मुंबई |’सध्याच्या संकटाच्या परिस्थितीत लोकांनी शिस्त पाळायलाच हवी. फक्त `मरकज’वालेच नियम मोडतात असं नाही. मरकजवाल्यांवर करोना संक्रमणाचे खापर फोडणारे तरी शिस्तीचे कोणते दिवे पाजळत आहेत,’ असा सवाल शिवसेनेनं केला आहे.
देशभरात करोनानं धुमाकूळ घातला असून रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, लोक शिस्त पाळताना दिसत नाहीत. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाचा वेगळाच अर्थ काढून रविवारी लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडले. मेणबत्त्या, टॉर्च घेऊन लोक रस्त्यावर उतरले होते. या संपूर्ण घडामोडींवर ‘सामना’च्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. ‘पंतप्रधानांच्या भावना लोकांपर्यंत नीट पोहोचत नाहीत. काहीतरी गडबड निश्चित आहे. अन्यथा रविवारी देशात अनेक ठिकाणी जे दिव्य प्रताप झाले ते घडले नसते, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.