Breaking-newsमुंबई

धक्कादायक! हिरे व्यापाऱ्याची सुसाईड नोट लिहून आत्महत्या

मुंबई | महाईन्यूज

नेपियन्सी रोडवरील एका १५ मजली इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून मंगळवारी सकाळी एका हिरे व्यापाऱ्याने आत्महत्या केली. धीरेनभाई चंद्रकांत शहा (६१) हिरे व्यापाऱ्याचे नाव आहे. आत्महत्येचं कारण मात्र समजू शकले नाही.याप्रकरणी डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

शहा यांच्या कार्यालयातील टेबलावर पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली. या नोटमध्ये माझ्या मृत्यूसाठी मी स्वत: जबाबदार आहे. त्यासाठी कुणालाही जबाबदार धरलं जाऊ नये, असं नमूद केल्याचे पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. शहा यांच्यामागे पत्नी, मुलगा व मुलगी आहे. त्यांचा मुलगा अमेरिकेत वास्तव्याला असून तिथे तो कुटुंबाचा व्यवसाय सांभाळतो आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button