दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी 2024पर्यंत प्रत्येक राज्यात NIA कार्यालय; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून मोठी घोषणा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/Amit-Shah-780x460.png)
नवी दिल्ली । महाईन्यूज । प्रतिनिधी ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दहशतवाद विरोधात झीरो टॉलरन्सचे धोरण अवलंब आहे आणि दहशतवादा विरोधात निर्णायक विजय मिळवण्यासाठी एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) आणि अन्य संस्थांचे बळकटीकरण केले जात आहे.
देशातील सायबर गुन्हे, दहशतवादी हल्ले यांसारखे अनेक गुन्हे नियंत्रणात राहावे यांसाठी सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यासाठी एनआयए या राष्ट्रीय तपास यंत्रणा अतिरिक्त अधिकार देण्यात आले असून 2024 पर्यंत प्रत्येक राज्यामध्ये त्याचे कार्यालय असेल अशी अशी महत्वाची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. दरम्यान अमित शाह यांनी आज हरियाणा मध्ये सूरजकुंड इथे आयोजित दोन दिवसीय ‘चिंतन शिबिराच्या’ पहिल्या दिवशी उपस्थितांना संबोधित केले. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, गृह मंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल आणि प्रशासक या चिंतन शिबिरामध्ये सहभागी झाले होते.
अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दहशतवाद विरोधात झीरो टॉलरन्सचे धोरण अवलंब आहे आणि दहशतवादा विरोधात निर्णायक विजय मिळवण्यासाठी एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) आणि अन्य संस्थांचे बळकटीकरण केले जात आहे. शाह यांनी सांगितले की 2024 पर्यंत सर्व राज्यांमध्ये एनआयएच्या शाखा स्थापन करून दहशतवादविरोधी जाळे उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शाह म्हणाले की, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत निर्णायक विजय मिळवण्यासाठी, कायद्याची चौकट मजबूत केली जात आहे, ज्या अंतर्गत, एनआयए आणि युएपीए कायद्यात सुधारणा करून, ‘वैयक्तिक दहशतवादी’ घोषित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.