breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

ड्रंकन ड्राईव्हमध्ये १६८४ परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव

पुणे : शहरात दिवसेंदिवस अपघातांच्या घटना वाढत असून, यामध्ये दारू पिऊन वाहन चालवून धडक दिल्याने बहुतांश घटनांची नोंद झाली आहे. त्यातच कल्याणीनगर येथील अपघात, नुकताच मद्यपी चालकाने भरधाव वेगात वाहन चालवून गस्तीवर असलेल्या पोलिसांना दिलेली धडक आणि एका मद्यपी चालकाने कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर पेट्रोल ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला होता.

त्याच धर्तीवर आता पोलिसांकडून १ जानेवारी ते ३० जूनदरम्यान ड्रंकन ड्राईव्ह करणाऱ्यांचे चालढकल संपली, तब्बल १ हजार ६८४ प्रकरणे परवाना निलंबित करण्यासाठी पाठवले आहेत.

हेही वाचा –  ब्लॅक स्पॉटवर तात्पुरती मलमपट्टी! शहरातील अपघातांचे सत्र सुरूच

त्यानंतर आता परवाने निलंबित करण्याच्या कारवाईला वेग आल्याचे दिसत आहे.  पुणे शहरातील वाहनचालकांनी नियम पाळावेत यासाठी वाहतूक शाखेकडून विशेष कारवाई करण्यात येत आहे. शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये होणाऱ्या अपघातांवर अंकुश लावण्याकरिता नाकाबंदी केली होती.

२१ मे २०२४ ते ८ जुलैदरम्यान विविध प्रकारच्या वाहतूक नियम भंगाच्या १ लाख ५८ हजार २६९ कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये तब्बल १२ कोटी २१ लाख ९३ हजारांचा दंड वसूल केला. यामध्ये ड्रंकन ड्राईव्हप्रकरणी १ हजार २३२ चालकांवर कारवाई केली आहे. १ जानेवारी २०२४ ते दि. ३० जून २०२४ दरम्यान १ हजार ६८४ मद्यपी चालकांवर ड्रंकन ड्राईव्हची कारवाई केली असून, त्यांचे परवाने निलंबित करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button