Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष क्रमांक एकवर आणून ठेऊ- एकनाथ खडसे
मुंबई: भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले एकनाथ खडसे हे मुंबईहून रात्री उशीरा मुक्ताईनगर येथे पोहोचलेले आहेत. मुक्ताईनगरला आलेल्या एकनाथ खडसे यांचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले आहे. उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष क्रमांक एकवर आणू, असा विश्वास खडसे यांनी या वेळी व्यक्त केलेला आहे.





