TOP Newsआंतरराष्टीयक्रिडाताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स संघाचा चौथा विजय

पुणे: आजच्या दुसऱ्या सामन्यात मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स विरूध्द कोल्हापूर ताडोबा टायगर्स अशी लढत बघायला मिळाली. दोन्ही संघानी संथ सुरुवात करत पहिल्या 8 मिनिटात 4-4 असा खेळ सुरु होता. त्यानंतर मात्र आकाश रूडेले ने चपळ खेळ करत कोल्हापूर ताडोबा टायगर्स संघावर लोन पडत आघाडी मिळवली.

मध्यंतराला 16-11 अशी मुंबई उपनगर संघाकडे आघाडी होती. अलंकार पाटील व रुतिक कांबळी ने चांगल्या पकडी करत बचावफळी सांभाळली. मध्यंतरानंतर मुंबई उपनगर संघाने कोल्हापूर वर आणखी लोन पाडत आघाडी मजबूत केली.

मुंबई उपनगर संघाकडून आकाश रुडेले ने सर्वाधिक चढाईत 10 गुण मिळवत विजयात महत्वाची भूमिका बजावली. तर मुंबई उपनगरच्या रुतिक कांबळीने हाय फाय पूर्ण केला. मुंबई उपनगर संघाने 39- 22 असा आपला चौथा विजय मिळवला. कोल्हापूरच्या तेजस पाटीलची 11 गुणांची खेळी व्यर्थ ठरली. कोल्हापूर संघाची बचावफळी निष्फल ठरली.

बेस्ट रेडर- तेजस पाटील, कोल्हापूर ताडोबा टायगर्स
बेस्ट डिफेडर- रुतिक कांबळी, मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स
कबड्डी का कमाल- आकाश रुडेले, मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button