Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

मुंबईला दहशतवादी हल्ला करत उडवून देण्याची धमकी आल्यानंतर आता पुन्हा एका धमकीच्या फोनने मुंबई अलर्टवर

मुंबई : मुंबईला दहशतवादी हल्ला करत उडवून देण्याची धमकी आल्यानंतर आता पुन्हा एका धमकीच्या फोनने मुंबई अलर्टवर गेली आहे. मुंबईतील ललित होटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. सोमवार संध्याकाळी फोन करून ही धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञाताने ललित हॉटेलमध्ये फोन करून पैशांची खंडणी मागितली. यामध्ये त्याने तब्बल ५ कोटींची खंडणी मागितली आहे. हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचं सांगितलं. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून फोन कोणी केला याचा शोध सुरू असल्याची माहिती आहे.

फोन केलेल्या व्यक्तीने हॉटेलमध्ये ४ ठिकाणी बॉम्ब ठेवला असल्याचं सांगितलं. खंडणी न मिळाल्यास हॉटेल उडवून देऊ अशी धमकी त्याने दिली. यानंतर हॉटेलमध्ये एकच धावपळ पाहायला मिळाली. तातडीने संपूर्ण सुरक्षा यंत्रणाकडून हॉटेलची झडती घेतली असता कुठेही बॉम्ब आढळून आला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये झडती घेतली असता बॉम्ब सापडला नाही आणि तो फेक कॉल होता, अशी पुष्टी पोलिसांनी केली आहे तर सध्या धमकी देणाऱ्या कॉलरचा शोध घेतला जात आहे. काही अज्ञात व्यक्तीने हॉटेलमध्ये फोन करून मुंबईतील ललित हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी ६ वाजता अज्ञात व्यक्तीने हॉटेलमध्ये फोन करून हॉटेलमध्ये चार ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगितले.

बॉम्बचा स्फोट होऊ नये यासाठी फोन करणाऱ्याने हॉटेल प्रशासनाकडे ५ कोटी रुपये मागितले. हॉटेलने ही माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांनी सर्वत्र तपास केला. मात्र, पोलिसांना काहीही सापडले नाही, त्यानंतर सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ३८५, ३३६, ५०७ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button