breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

रिझर्व्ह बँकेने एसबीआयला ठोठावला १ कोटींचा दंड

नवी दिल्ली – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयला दंड ठोठावला आहे. आरबीआयच्या नियामक निर्देशांचे पालन न केल्याप्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडियाला तब्बल १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, एसबीआयकडून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया निर्देश २०१६चे पालन न केल्याप्रकरणी ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एसबीआयकडून मेन्टेन केल्या जाणाऱ्या ग्राहकाच्या खात्याची चौकशी केली. या तपासणीत एसबीआयने आरबीआयच्या सूचनांचे पालन करण्यास विलंब केल्याचे आढळले. आरबीआयने ग्राहकाच्या खात्यासह त्याच्या इतर संबंधित गोष्टींचीही पडताळणी केली. त्यात नियमांचे पालन न झाल्याचे आढळल्याने ही कारवाई झाली आहे.

एसबीआयकडून खात्यातील फसवणुकीची माहिती आरबीआयला उशिरा देण्यात आली. त्यामुळे एसबीआयला या प्रकरणात कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. त्यात सूचनांचे पालन न केल्याबद्दल त्यांच्यावर दंड का आकारला जाऊ नये? याबाबत एसबीआयने दिलेल्या उत्तरानंतर आरबीआयने देशातील या सर्वात मोठ्या बँकेला १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय दिला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button