breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये रंगणार एलिमिनेटर सामना!

MI vs RCB WPL l आज गतविजेता मुंबई इंडियन्स महिला संघ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला संघ अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी एलिमिनेटर सामने खेळणार आहे. हा सामना जिंकणाऱ्या संघाचा अंतिम फेरीत गेल्या वर्षीच्या उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सशी सामना होणार आहे. अशा परिस्थितीत आज मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याशी संबंधित सर्व माहिती जाणून घेऊयात…

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना आज म्हणजेच शुक्रवार, १५ मार्च रोजी होणार आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल. Viacom १८ ग्रुपकडे महिला प्रीमियर लीगचे प्रसारण करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. या स्पर्धेचे सर्व सामने स्पोर्ट्स १८ नेटवर्कच्या स्पोर्ट्स १८ १ आणि स्पोर्ट्स १८ १ एचडी चॅनेलवर पाहता येतील.

हेही वाचा    –    थेरगाव येथील बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौक रस्त्याचे फूटपाथ ‘अर्बन स्ट्रीट डिझाईन’

जिओ सिनेमावर हा सामना प्रसारित होत आहे. या ॲपमध्ये थेट सामने पाहण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या फोनवर Jio Cinema ॲप इन्स्टॉल करून महिला प्रीमियर लीगचे सर्व सामने विनामूल्य पाहू शकता.

RCB संभाव्य प्लेइंग इलेव्हन :

स्मृती मानधना (कर्णधार), सोफी मोलिनक्स, एलिस पेरी, सोफी डिव्हाईन, रिचा घोष (यष्टीरक्षक), जॉर्जिया वॅरेहम, दिशा कसाट, श्रेयंका पाटील, आशा शोभना, श्रद्धा पोखरकर, रेणुका ठौरकर.

MI संभाव्य प्लेइंग इलेव्हन :

हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, प्रियांका बाला (विकेटकीपर), हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, अमनजोत कौर, सजेवन सजना, पूजा वस्त्राकर, हुमैरा काझी, शबनीम इस्माईल, सायका इशाक.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button