ताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई
‘मुक्ताई’चा पहिला पोस्टर रिलीज
मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वरांची भूमिका हे कलाकार साकारणार
!['Muktai', first, poster, release, Muktabai, Dnyaneshwar, roles, actors, will play,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/muktai-780x470.jpg)
मुंबई : महाराष्ट्राच्या आध्यात्मिक पायाभरणीत वारकरी संप्रदाय हा महत्वाचा मानला जातो. महाराष्ट्राला भक्तिमार्गाला नेण्यात वारकरी संप्रदायाने मोठी भूमिका बजावली आहे. वारकरी संप्रदायात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानदेव, संत सोपानकाका, संत मुक्ताबाई यांचं नाव सगळ्यात आधी घेतलं जातं. त्यांना विरक्ती, ज्ञान, भक्ती आणि मुक्ती यांचं मूर्तिमंत स्वरूप मानलं जातं. मात्र त्यांच्या माता पित्याला देहदंड स्वीकारावा लागला. मातापित्याच्या देहत्यागानंतर हे कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी मुक्ताबाईंवर पडली. तिने आईच्या निसर्गदत्त भावनेने ती पेलली. आपल्या भावंडांची जणू ती माऊलीच झाली. आता हीच मुक्ताई मोठ्या पडद्यावर आपल्या भेटीला येत आहे. संत मुक्ताबाई यांचे चरित्र उलगडून दाखवणारा ‘मुक्ताई’ हा चित्रपट २ ऑगस्ट रोज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.